सोलापूर विधान परिषद मतदानाला वेग; पहिल्या तासात सुमारे ६० मतदारांनी बजावला हक्क
सोलापूर, 18 जून (हिं.स.)। संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला गुरुवारी सकाळी उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. सर्वाधिक ६१५ मतदार असलेल्या उत्तर सोलापूर तहसील कार्यालयात सकाळी आठ वाजल्यापासूनच मतदानासाठ
gfd


सोलापूर, 18 जून (हिं.स.)।

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला गुरुवारी सकाळी उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. सर्वाधिक ६१५ मतदार असलेल्या उत्तर सोलापूर तहसील कार्यालयात सकाळी आठ वाजल्यापासूनच मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सकाळी मतदान केंद्राची पाहणी केली. मतदान केंद्र परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, पोलिस उपायुक्त प्रीतम यावलकर स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

यंदाच्या मतदानात बार्शी तालुक्याची एकजूट विशेष चर्चेचा विषय ठरली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांच्यासह बार्शी नगरपालिकेचे सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे पदाधिकारी आणि वैराग नगरपालिकेचे सदस्य यांनी एकत्रितपणे मतदान केले.

त्यानंतर उत्तर सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, पंचायत समिती सभापती तेजस्विनी बोराडे आणि नान्नजच्या सदस्य चेताली मुळे यांनी मतदानाचा हक्क बजावला.

शिवसेनेचे प्रभाग क्रमांक १६ चे सदस्य प्रियदर्शन साठे यांनी सकाळी नऊ वाजता मतदान केले. काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे आणि नगरसेवक नरसिंह आसादे हेही मतदान केंद्राबाहेर उपस्थित राहून घडामोडींवर लक्ष ठेवून होते.

पहिल्या तासात सुमारे ६० मतदारांनी मतदान केल्याची नोंद झाली. दरम्यान, सोलापूर महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे ९५ सदस्य एकत्रितपणे मतदानासाठी येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande