
लातूर, 18 जून (हिं.स.)। राष्ट्रीय परीक्षा एजेंसीमार्फत (एनटीए) २१ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली ‘नीट युजी २०२६’ ही परीक्षा पारदर्शकपद्धतीने पार पडावी, यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा पुरविण्याबाबत ‘एनटीए’ने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार आवश्यक सुविधा परीक्षा केंद्रांवर उपलब्ध असल्याची खात्री करावी. तसेच विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी काळजीपूर्वक आणि समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis