अमरावतीत महापौरांसह नगरसेवकांनी बजावला मतदानाचा हक्क
अमरावती, 18 जून (हिं.स.)। अमरावती विधान परिषद मतदानाला आज सकाळी सुरुवात झाल्यानंतर भाजप चे सर्व नगर सेवक महापौर व पदाधिकारी भाजप कार्यालयात एकत्र आले त्यांनतर यांनी तहसील कार्यालय गाठत मतदान केले.त्यानंतर युवा स्वाभिमान,एम आय एम,राष्ट्रवादी काँग्
महापौर सह नगरसेवकांनी  बजावला मतदानाचा हक्क


अमरावती, 18 जून (हिं.स.)। अमरावती विधान परिषद मतदानाला आज सकाळी सुरुवात झाल्यानंतर भाजप चे सर्व नगर सेवक महापौर व पदाधिकारी भाजप कार्यालयात एकत्र आले त्यांनतर यांनी तहसील कार्यालय गाठत मतदान केले.त्यानंतर युवा स्वाभिमान,एम आय एम,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट,बीएसपी,शिवसेना उबाथ,शिंदे गट या सर्व नगरसेवकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला यावेळी प्रवीण पोटे पाटील यांचा विजय विजय जवळपास निश्चित झाला असल्याचे मत महापौर श्रीचंद तेजवाणी यांनी व्यक्त केले.

विधान परिषदेची निवडणूक आज होत असून भाजपचे प्रवीण पोटे यांचा विजय निश्चित असल्याचे मत नगरसेवक प्रशांत देशपांडे यांनी यावेळी व्यक्त केले काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांनी मैदान सोडल्यामुळे आता भाजपचे प्रवीण पोटे आणि वंचितचे निलेश विश्वकर्मा हे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रवीण पोटे यांनी गेल्या दोन वर्षापासूनच निवडणुकीची तयारी केलेली असल्यामुळे त्यांच्या प्रचाराच्या तीन ते चार फेऱ्या निवडणुकीपूर्वीच झाल्यामुळे जवळपास सर्वच मतदारांपर्यंत ते पोहोचलेत, त्यामुळे त्यांचा विजय निश्चित समजला जातो.

कॉग्रेसने काढलेला व्हीप संपूर्णतः चुकीचा असून जिथे हात वर करून मतदान करावयाचे असते तिथे अशा प्रकारे व्हीप जारी करता येतो व अशाप्रकारे जारी झालेला पक्षादेशाचा अनादर कुणी केल्यास त्याच्यावर कारवाई करून त्याचे सदस्यत्व रद्द करता येते तथापि आज होणाऱ्या विधान परिषदेच्या मतदानात अशा प्रकारे व्हीप काढता येत नाही.त्यामुळे काँग्रेस ने चुकीचा व्हीप काढला असल्याचे ही चर्चा मतदान केंद्रावर सुरू होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande