
रत्नागिरी, 18 जून (हिं.स.) । भाजपच्या नगरसेविका सौ. सुप्रिया रसाळ आणि संदीप रसाळ यांच्या प्रयत्नाने भाजपतर्फे रत्नागिरी शहरासाठी वैकुंठ रथ प्राप्त झाला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या स्वनिधीतून हा रथ रत्नागिरीमध्ये विनामूल्य सेवा देणार आहे. या रथाचे लोकार्पण प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या उपस्थितीत मारुती मंदिर येथील स्वा. सावरकर नाट्यगृह येथे करण्यात आले.
प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक व रत्नागिरीचे सुपुत्र अनिकेत पटवर्धन यांच्या सहकार्याने हा रथ रत्नागिरीसाठी प्राप्त झाला.
गेले सुमारे तीन महिने या रथासाठी रसाळ दांपत्याने प्रयत्न केले. शहरात कोणाचे निधन झाल्यास विनामूल्य वैकुंठ रथाची रथाची सेवा देण्यात येणार आहे. यासाठी संदीप रसाळ (8329970948, 9860041337) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी