सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राजेंद्र राऊत यांच्या विजयाचा भाजपला विश्वास
सोलापूर, 18 जून (हिं.स.)सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठीच्या मतदानादरम्यान सिव्हिल चौक येथील उत्तर तहसील कार्यालयातील मतदान केंद्राला भेट देण्यात आली. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांशी संवाद साधून मतदान प्रक्रियेची मा
evm


सोलापूर, 18 जून (हिं.स.)सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठीच्या मतदानादरम्यान सिव्हिल चौक येथील उत्तर तहसील कार्यालयातील मतदान केंद्राला भेट देण्यात आली. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांशी संवाद साधून मतदान प्रक्रियेची माहिती घेण्यात आली.प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे अधिकृत उमेदवार राजेंद्र राऊत हे विक्रमी मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींनी भारतीय जनता पक्षाच्या विकासाभिमुख विचारसरणीवर आणि नेतृत्वावर दाखविलेला विश्वास या विजयातून अधोरेखित होईल, असा दावा यावेळी करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande