बीड - गणेश मंदिर मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
बीड, 18 जून (हिं.स.)। लवकरच सुरू होणाऱ्या पवित्र श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर भाविक व नागरिकांच्या सोयीसाठी परळी वैजनाथ नगर परिषदेमार्फत हनुमान नगर चौक ते दक्षिणमुखी गणेश मंदिर मार्गावरील पॅचेस व खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ना
अ


बीड, 18 जून (हिं.स.)। लवकरच सुरू होणाऱ्या पवित्र श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर भाविक व नागरिकांच्या सोयीसाठी परळी वैजनाथ नगर परिषदेमार्फत हनुमान नगर चौक ते दक्षिणमुखी गणेश मंदिर मार्गावरील पॅचेस व खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नायरा पेट्रोल पंपाजवळील पुलावर जड वाहनांच्या सततच्या टायर घर्षणामुळे मोठा खड्डा पडल्याचे निदर्शनास आले होते. नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतुकीची सुलभता लक्षात घेऊन संपूर्ण पुलावर काँक्रिट टाकण्याचे काम हाती घेण्यात आले असून आज प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली. श्रावण महिन्यात परळीत येणाऱ्या हजारो भाविकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषद कटिबद्ध आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande