हिंदी विद्यापीठात रविवारी जागतिक योग दिनाचे आयोजन
वर्धा १८ जून (हिं.स.) : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा येथे रविवार, २१ जून रोजी १२ वा जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मेजर ध्यानचंद प्रांगणावर सकाळी ५:४५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. य
महात्मा गांधी हिंदी विद्यापीठ लोगो


वर्धा १८ जून (हिं.स.) : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा येथे रविवार, २१ जून रोजी १२ वा जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मेजर ध्यानचंद प्रांगणावर सकाळी ५:४५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावर्षीची संकल्पना “निरोगी आयुष्यासाठी योग” अशी आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ६:३० वाजता माननीय पंतप्रधानांच्या ऑनलाइन संबोधनाने होईल. या प्रसंगी कुलगुरू प्रो. कुमुद शर्मा उपस्थितांना संबोधित करतील.शारीरिक शिक्षण व क्रीडा समितीचे समन्वयक व अध्यक्ष प्रो. फरहद मलिक कार्यक्रमाची प्रस्तावना सादर करतील. योग प्रशिक्षक श्रीमती संगीता सोमनकर यांच्याकडून मुख्य योग सत्र व सामान्य योग पद्धतीचे प्रात्यक्षिक दिले जाईल.

कार्यक्रमाचे संचालन सहायक प्राध्यापक डॉ. संदीप सपकाळे करतील, तर आभार प्रदर्शन शारीरिक शिक्षण व क्रीडा समितीचे समन्वयक व पदेन सचिव डॉ. निशीथ राय करतील.

विद्यापीठ प्रशासनाने सर्व शिक्षक, कर्मचारी, संशोधक व विद्यार्थ्यांना या योग दिन कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमाचा उद्देश निरोगी जीवनशैलीचा प्रसार करणे आणि योगाचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचवणे हा आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande