
बीड, 18 जून (हिं.स.) : केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी मतदारसंघातील विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला तसेच संबंधित अधिकारी व अभियंत्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब सांस्कृतिक सभागृहाच्या सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी करून कामाच्या गुणवत्तेचा आढावा घेतला. हे सभागृह सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे प्रभावी केंद्र म्हणून विकसित व्हावे यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.केज तालुका क्रीडा संकुलाच्या बांधकामाची पाहणी करून कामाची सद्यस्थिती जाणून घेतली. तालुक्यातील खेळाडूंना आधुनिक व दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. केजडी नदी व तलाव परिसरात सुरू असलेल्या हरितक्षेत्र विकासकामांची पाहणी केली. पर्यावरण संवर्धन, परिसराचे सौंदर्यीकरण आणि नागरिकांसाठी अधिक चांगल्या सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis