
छत्रपती संभाजीनगर, 18 जून (हिं.स.) : भारतीय जनता पक्ष, छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालय येथे केंद्रीय राज्यमंत्री (ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण) मा. ना. श्रीमती निमुबेन बंभानिया यांच्या प्रमुख उपस्थितीत विकसित भारत संकल्प संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.यावेळी विकसित भारताच्या संकल्पनेला गती देण्यासाठी केंद्र सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजना, आत्मनिर्भर भारत, महिला सक्षमीकरण, युवा विकास तसेच देशाच्या सर्वांगीण प्रगतीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत देशाने केलेल्या विकासकामांचा आढावा घेत विकसित भारताच्या निर्मितीसाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले.
----------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis