
नांदेड, 19 जून (हिं.स.)।
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत ऑगस्ट-2026 सत्रासाठीची प्रवेश प्रक्रीया 21 मे 2026 पासुन आयटीआय Admission Portal: https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर सुरु करण्यात आलेली आहे. नांदेड जिल्हयातील युवक व युवती ( उमेदवारांनी ) यांनी मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज व निश्चितीकरण करण्याचे आवाहन श्री गुरु गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस. व्ही. सुर्यवंशी यांनी केले आहे. यासाठी दहावी उत्तीर्ण अथवा अनुर्तीर्ण इच्छुक विद्यार्थी अर्ज करु शकतात असेही कळविले आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपध्दती व माहीती पुस्तीका ऑनलाईन स्वरुपात संकेतस्थळावर Download Section मध्ये पीडीएफ स्वरुपात उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदवून झाल्यावर उमेदवारांनी नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपला अर्ज निश्चित करावा व त्यानंतर विकल्प सादर करावे. प्रवेश प्रकियेच्या विविध टप्प्यांबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये समुपदेशन करण्यात येत आहे. यामध्ये उमेदवारांना विविध व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती देण्यात येते.
राज्यभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये एकुण 83 प्रकारच्या व्यवसाय अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जात असुन त्यांची एकुण वार्षिक प्रवेश क्षमता जवळपास एक लक्ष ऐवढी आहे. येणाऱ्या कालावधीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये जादा मागणीचे तसेच आधिकचे तंत्रज्ञानावर आधारित 652 नवीन अभ्यासाच्या तुकडया समाविष्ठ करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच जागतिक बँकेच्या सहकार्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्था अधुनिकरण करण्यात येत आहे. तसेच आयटीआय प्रवेशित उमेदवारांना प्रतिमाह देण्यात येणाऱ्या विद्या वेतनात वाढ करण्यात आलेले आहे. विविध प्रवर्गात उमेदवारासाठी प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्वी योजनाही लागु करण्यात आलेली आहे. दहावी अनुउत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर नियमानुसार दहावी उत्तीर्ण समकक्षता करण्यात येते तर दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर नियमानुसार बारावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते.
तरी दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की आयटीआय मधुन व्यवसायिक शिक्षण पुर्ण करुण त्वरित रोजगार स्वयंरोजगार अथवा उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त होण्यासाठी आयटीआय मध्ये प्रवेश घ्यावे.
श्री गुरु गोबिंदसिघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड, येथे प्रवेश सत्र ऑगस्ट - 2026 करीता एकुण - 23 व्यवसायाच्या 38 तुकडया अंतर्गत 816 जागा करीता प्रवेश उपलब्ध आहेत. ज्यामध्ये 8 व्यवसाय 10 वी उत्तीर्ण / अनुउत्तीर्ण पात्रतेवर तर 15 व्यवसाय 10 उत्तीर्ण पात्रतेवर प्रवेशासाठी उपलब्ध आहे. प्रवेच्छुक उमेदवारांनी www.admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पदधतीने अर्ज व प्रवेश शुल्क भरावे व नंतर नजीकच्या शासकीय किंवा खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जाऊन अर्ज निश्चीत करणे आवश्यक आहे. अर्ज निश्चीतीकरण केल्यानंतरच उमेदवारांना व्यवसायाची निवड करता येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis