भीमा नदीवरील पायाभूत सुविधा मजबूत; तीन पुलांची कामे प्रगतीपथावर
सोलापूर, 19 जून (हिं.स.)। करमाळा आणि इंदापूर तालुक्यात भीमा नदीवर तीन ठिकाणी नवे पूल उभारण्यात येत आहेत. हे तिन्ही पूल तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांनी मंजूर केलेल्या ७७७ कोटी रुपयांच्या निधीतून बांधले जात असून, या प्रकल्पांमुळे दोन्ही
ujani dam news


सोलापूर, 19 जून (हिं.स.)।

करमाळा आणि इंदापूर तालुक्यात भीमा नदीवर तीन ठिकाणी नवे पूल उभारण्यात येत आहेत. हे तिन्ही पूल तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांनी मंजूर केलेल्या ७७७ कोटी रुपयांच्या निधीतून बांधले जात असून, या प्रकल्पांमुळे दोन्ही तालुक्यांतील ग्रामस्थांना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.

या पुलांच्या कामासाठी इंदापूरचे आमदार तथा कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आणि करमाळ्याचे माजी आमदार संजय शिंदे यांच्या पाठपुराव्याला महत्त्वपूर्ण यश मिळाल्याचे सांगण्यात आले आहे.

कोंढार चिंचोली (ता. करमाळा) ते डिकसळ (ता. इंदापूर) दरम्यान जुन्या ब्रिटीशकालीन पुलाचे अस्तित्व संपल्याने नवीन पूल उभारण्यात येत असून, यासाठी ५५ कोटी रुपयांची तरतूद राज्य शासनाने केली आहे.

दुसरा पूल कुगाव (ता. करमाळा) ते शिरसोडी (ता. इंदापूर) दरम्यान साकारत असून, त्यासाठी ३८२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या कामाची प्रगती सुरू आहे.

तिसरा पूल चांडगाव (ता. इंदापूर) ते पोमलवाडी (ता. करमाळा) दरम्यान उभारला जात असून, या प्रकल्पासाठी ३४० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे आणि त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

या तिन्ही पुलांना उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांचे नाव देण्याची ग्रामस्थांची मागणीही पुढे आली आहे.

दरम्यान, उजनी धरण परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी, व्यापारी आणि मच्छीमारांनी कृषी पर्यटनाला चालना द्यावी तसेच हॉटेल्स, कॉटेज, लॉजिंग आणि बोटिंग सेंटरसारख्या उद्योगांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. भविष्यात हा परिसर उजनी पर्यटन मार्ग म्हणून विकसित होईल आणि शेतीपूरक व्यवसायांमुळे आर्थिक स्तर उंचावेल, असे मत व्यक्त करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande