अतुल सावे यांनी दिली आ. रमेश बोरनारे यांच्या निवासस्थानी भेट
छत्रपती संभाजीनगर, 19 जून (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री अतुल सावे यांनी आमदार रमेश बोरनारे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी सहकार क्षेत्रातील वि
अ


छत्रपती संभाजीनगर, 19 जून (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री अतुल सावे यांनी आमदार रमेश बोरनारे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

यावेळी सहकार क्षेत्रातील विविध विषय, जिल्ह्याच्या विकासाबाबत तसेच आगामी निवडणुकीसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. अतुलजी सावे यांचा आदरपूर्वक सन्मान करत सत्कार केला व त्यांच्या या भेटीबद्दल मनःपूर्वक आभार मानले.

यावेळी आमदार अनुराधा चव्हाण, आमदार नितीनजी पाटील, नगराध्यक्ष दिनेशभाऊ परदेशी, भाजप जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र काका शेळके, एकनाथ भाऊ जाधव व नगरसेवक संजय पा बोरनारे उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande