पाथरीत खासदार बंडू जाधव यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
परभणी, 19 जून (हिं.स.)। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवार पाथरी तहसिल कार्यालयासमोर खासदार बंडू जाधव यांच्या भूमिकेविरोधात प्रतीकात्मक निषेध आंदोलन केले.शहरातून मोर्चा काढत तहसिलसमोर खासदार जाधव यांच्या प्रतिकात्मक प
Q


परभणी, 19 जून (हिं.स.)।

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवार पाथरी तहसिल कार्यालयासमोर खासदार बंडू जाधव यांच्या भूमिकेविरोधात प्रतीकात्मक निषेध आंदोलन केले.शहरातून मोर्चा काढत तहसिलसमोर खासदार जाधव यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून त्याचे दहन केले. व “गद्दारी खपवून घेणार नाही” अशा घोषणा देण्यात आल्या.

या आंदोलनात जिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे यांच्यासह कल्याणराव रेंगे, मुंजाभाऊ कोल्हे, हरिभाऊ वाकणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. तहसिलसमोर झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. नागरिकांनीही आंदोलनाची दखल घेतली.

दरम्यान, जिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “बाळासाहेबांची विचारधारा सोडून सत्तेच्या जवळ जाणाऱ्या निर्णयांचा आम्ही निषेध करत आहोत. जनतेचा विश्वासघात करणाऱ्या लोकप्रतिनिधींना लोकशाही मार्गाने जाब विचारला जाईल.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande