
रत्नागिरी, 19 जून (हिं.स.) । येत्या रविवारी, दि. २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्हा क्रीडा संकुल (बॅडमिंटन हॉल) मारुती मंदिर येथे सकाळी 7.30 वाजता साजरा करण्यात येणार आहे.
त्यानिमित्ताने योग प्रात्यक्षिक व जनजागृती कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये जिल्ह्यातील निवडक शाळांमधील विद्यार्थी, स्काऊट व गाइड, मेरा युवा भारत, एन.सी.सी., एन.एस.एस. विद्यार्थी, क्रीडा शिक्षक, योग शिक्षक, शासकीय अधिकारी, कर्मचारी, विविध खात्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी