
बीड, 19 जून (हिं.स.)।
आंतरराष्ट्रीय योग दिन 2026
दि. 21 जून रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन यांनी केले आहे.
स्थळ : जिल्हा क्रीडा संकुल, जालना रोड, बीड सकाळी 6.30 वाजता आयोजन करण्यात आले आहे
योग हा निरोगी शरीर, शांत मन आणि सकारात्मक जीवनशैलीचा आधार आहे. या विशेष दिवशी सामूहिक योगाभ्यासात सहभागी होऊन आरोग्यदायी जीवनाचा संकल्प करूया.
अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, युवक-युवती, योगसाधक तसेच सर्व नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे.
चला, एकत्र येऊया आणि योगाच्या माध्यमातून निरोगी व सशक्त समाज घडवूया!
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis