जालना येथे ‘विकसित भारत की पहचान’ जनजागृती उपक्रमाचा शुभारंभ
छत्रपती संभाजीनगर, 19 जून (हिं.स.) :भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली तसेच समाज कल्याण आयुक्तालय, पुणे आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, जालना यांच्या वतीने ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत ‘विकसित भारत की
जालना येथे ‘विकसित भारत की पहचान’ जनजागृती उपक्रमाचा शुभारंभ


छत्रपती संभाजीनगर, 19 जून (हिं.स.) :भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली तसेच समाज कल्याण आयुक्तालय, पुणे आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, जालना यांच्या वतीने ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत ‘विकसित भारत की पहचान’ या विशेष जनजागृती उपक्रमास प्रारंभ करण्यात आला.

या अभियानाच्या माध्यमातून समाजात व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करून निरोगी आणि सुदृढ समाज निर्माण करण्याचा संदेश देण्यात येत आहे. अभियानाच्या उद्घाटनावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नशामुक्तीची शपथ घेऊन उपक्रमाला सुरुवात केली.

‘विकसित भारत की पहचान’ या संकल्पनेवर आधारित हा विशेष जनजागृती सप्ताह राबविण्यात येणार असून, शाळा, महाविद्यालये आणि शासकीय वसतिगृहांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यात निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा तसेच जनजागृतीपर उपक्रमांचा समावेश असेल.

विद्यार्थी आणि युवकांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

कार्यक्रमात सहाय्यक आयुक्त समाज कल्याण डॉ. अनिता राठोड यांनी अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम याबाबत माहिती दिली. व्यसनामुळे कुटुंब व्यवस्था आणि समाजजीवनावर गंभीर परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तरुण पिढीत वाढत्या व्यसनाधीनतेबाबत चिंता व्यक्त करत, या समस्येवर मात करण्यासाठी व्यापक जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमास विशेष अधिकारी स्नेहल मोवळे, समाज कल्याण निरीक्षक सुरेंद्र चितेकर, मुख्याध्यापक डॉ. दिलीप गिरी तसेच कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘नशामुक्त भारत’ घडविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला असून, नागरिकांनी व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारून या सामाजिक चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande