छ. संभाजीनगर - बारी समाजबांधवांच्या विविध न्याय्य मागण्यांविषयी सविस्तर चर्चा
छत्रपती संभाजीनगर, 19 जून (हिं.स.)। भोकरदन विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष दानवे यांच्या भोकरदन येथील निवासस्थानी भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघातील बारी समाजाचे प्रमुख पदाधिकारी व समाजबांधवांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी समाजबांधवांच्या विविध
Q


छत्रपती संभाजीनगर, 19 जून (हिं.स.)। भोकरदन विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष दानवे यांच्या भोकरदन येथील निवासस्थानी भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघातील बारी समाजाचे प्रमुख पदाधिकारी व समाजबांधवांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी समाजबांधवांच्या विविध न्याय्य मागण्यांविषयी सविस्तर चर्चा झाली व त्यांनी मला एक निवेदन सुपूर्द केले. त्यामध्ये प्रामुख्याने खालील विषयांवर शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

राष्ट्रसंत श्री. रुपलाल महाराज स्मारक : सन २०२३-२४ मध्ये मंजूर झालेल्या, श्रीक्षेत्र अंजनगाव सुर्जी (जिल्हा अमरावती) येथील प्रस्तावित राष्ट्रीय स्मारकाच्या बृहत् आराखड्यानुसार तात्काळ निधी उपलब्ध करून देणे.

आर्थिक विकास महामंडळ: राज्यातील बारी समाजातील नवयुवक, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शासनाने घोषित केलेल्या ‘राष्ट्रसंत रुपलाल महाराज बारी समाज आर्थिक विकास महामंडळास’ ५०० कोटी रुपयांचा निधी त्वरित वर्ग करणे.

बारी समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी तसेच या दोन्ही महत्त्वपूर्ण मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी राज्य शासनाकडे वैयक्तिक पातळीवर आणि सातत्याने सकारात्मक पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही मी सर्व समाजबांधवांना दिली आहे.

समाजबांधवांच्या पाठीशी आम्ही सदैव खंबीरपणे उभे आहोत. या प्रसंगी बारी समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी आणि बहुसंख्येने समाजबांधव उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande