
भल्या पहाटे नाशिकच्या दूध बाजारात अधिकाऱ्यांसह मारला छापा
नाशिक, 19 जून (हिं.स.) - नाशिकच्या दूध बाजारामध्ये राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळानी नाशिकच्या दूध बाजारामध्ये सकाळी अचानक प्रवेश केल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली या ठिकाणी त्यांनी काही दुधाचे नमुने देखील घेतले आहेत.
मागील काही दिवसापासून सातत्याने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कामकाजाबाबत नाराजीचा सूर होता अलीकडच्या काळामध्ये याच विभागात मंत्रालयात काम करणाऱ्या एका लिपिकाला लाच घेताना देखील पकडण्यात आले होते असं सर्व घडत असताना या विभागाचा कारभार राज्याचे जेष्ठ आय एस एस अधिकारी आणि शिस्तीचे भोक्ते असलेले तुकाराम मुंढे यांच्याकडे देण्यात आला आहे. मुंडे यांनी या विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर सातत्याने वेगवेगळ्या स्वरूपाच्या कारवाया या राज्यांमध्ये सुरू आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या विभागाचा कारभार सांभाळणारे मंत्री नरहरी झिरवाळ हे नाशिक जिल्ह्याचे असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कारभार सुरू आहे
नाशिक दौऱ्यावरती असलेले अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी शुक्रवारी सकाळी अचानक नाशिक मधील जुन्या नाशिक परिसरात असलेल्या दूध बाजार या ठिकाणी आपल्या विभागातील अधिकाऱ्यांसह छापा टाकला आणि नाशिक शहरात होणाऱ्या दूध पुरवठ्याच्या संदर्भामध्ये माहिती घेतली तसेच काही दूध विक्रेत्यांच्या दुधाचे नमुने देखील तपासणीसाठी घेतले आहेत अचानकपणे दस्तूर खुद्द मंत्री महोदय बाजारात आल्यामुळे काही काळ खळबळ उडाली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV