
छत्रपती संभाजीनगर, 19 जून (हिं.स.)।
माझ्या शब्दाने मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं. त्यासाठी मी आभार मानतो. पण इथून पुढे त्यांनी आंदोलन करू नये. अशी विनंती भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. येत्या 'दोन दिवसात राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयाला जीआर पोहोचतील, ज्यांची फी घेतल्या त्या परत करू, असे आश्वासन भाजप नेते प्रसाद लाड यांचा जरांगेंना दिले.
शाळेत महाविद्यालयात गेल्यावर 100% फी घेतली जात आहे. म्हणजे सरकारी आदेश काढला असताना असं का? म्हणजे शासन फक्त नावाला जीआर काढताय का? सरकार जर आदेश काढत असेल तर अधिकाऱ्यांना त्रास काय? असा सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रसाद लाड यांना केला.
दरम्यान, यावर उत्तर देताना प्रसाद लाड यांनी मोठी घोषणा केली. ते म्हणाले, या कायद्यांची जो अधिकारी अंमलबजावणी करणार नाही त्यावर आम्ही कारवाई करू. शिवाय मुख्यमंत्र्यांना भेटून मी हा विषय कानावर घालतो. सोबतच ज्यांनी शालेय फी भरली असेल त्यांना त्यांची फी परत देऊ, तसेच मराठा उपसमितीच्या बैठकीत या संदर्भात चर्चा करू. किंबहुना सोमवारपर्यंत सर्व शाळा महाविद्यालयांना या संदर्भात आदेश पारित करू, असा शब्द प्रसाद लाड यांनी दिला आहे.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis