पुण्यात स्मार्ट मीटर बसवणी सुरू; ग्राहक संघटनांचा विरोध कायम
पुणे, 19 जून (हिं.स.)।पुणे शहर आणि परिसरात महावितरणकडून मोठ्या प्रमाणावर स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू असताना या मीटरबाबत विविध गैरसमज आणि अफवा पसरत असल्याचे दिसून येत आहे. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिले वाढतात, मीटर प्रीपेड असल्यामुळे आधी रिच
पुण्यात स्मार्ट मीटर बसवणी सुरू; ग्राहक संघटनांचा विरोध कायम


पुणे, 19 जून (हिं.स.)।पुणे शहर आणि परिसरात महावितरणकडून मोठ्या प्रमाणावर स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू असताना या मीटरबाबत विविध गैरसमज आणि अफवा पसरत असल्याचे दिसून येत आहे. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिले वाढतात, मीटर प्रीपेड असल्यामुळे आधी रिचार्ज करावा लागतो आणि मीटर वेगाने धावतात, अशा प्रकारच्या शंका ग्राहकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. मात्र या सर्व आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचा दावा महावितरणने केला आहे. दुसरीकडे, ग्राहक संघटनांनी या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित करत विरोध कायम ठेवला आहे.

महावितरणच्या स्पष्टिकरणानुसार, स्मार्ट मीटर हे पूर्णपणे पोस्टपेड स्वरूपाचे आहेत. त्यामुळे ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच वीज वापरल्यानंतर बिल दिले जाणार असून कोणत्याही प्रकारे आधी रिचार्ज करण्याची आवश्यकता नाही. मीटरमधील रीडिंगच्या आधारे नियमित छापील वीजबिल तयार करून ग्राहकांना दिले जाईल. तसेच वीजबिल भरण्यासाठी दिली जाणारी २१ दिवसांची मुदतही यापुढे कायम राहणार आहे.

स्मार्ट मीटरमुळे रीडिंगमधील मानवी चुका टाळता येणार असल्याचेही महावितरणने स्पष्ट केले आहे. या प्रणालीमध्ये वीजमीटरचे रीडिंग थेट सर्व्हरवर पाठवले जाते, त्यामुळे कर्मचारी प्रत्यक्ष घरी जाऊन रीडिंग घेण्याची गरज राहत नाही. नियोजित तारखेलाच मीटरचे रीडिंग आपोआप सर्व्हरवर पाठवले जाते, त्यामुळे वेळेवर आणि अचूक बिल मिळण्यास मदत होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande