
जालना, 19 जून (हिं.स.)।
जालना शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार रावसाहेब पाटील दानवे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. तेघबीर सिंह संधू यांची भेट घेऊन कायदा व सुव्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी दत्तनगर येथील सिंधी कॉलनीतील दगडफेक प्रकरणासह शहरातील विविध भागांमध्ये घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, तसेच शहरात पोलिसांचा वचक अधिक प्रभावीपणे निर्माण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली.
पोलीस अधीक्षकांनी या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक ती कठोर व परिणामकारक पावले उचलण्याची ग्वाही दिली.
याप्रसंगी माजी आमदार कैलास गोरंट्याल, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, भाजप नेते भास्कर आबा दानवे यांच्यासह अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis