
छत्रपती संभाजीनगर, 19 जून (हिं.स.)।
महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी देविजींच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगना व इतर राज्यातून भाविक कुलदेवता असल्याने या ठिकाणी कुलाचार व कुलधर्म करण्यासाठी मोठ्या संख्येने भक्तिभावाने येतात.
श्री देविजीची सिंहासन पुजा ही अत्यंत महत्वाची मानली जाते. ही सिंहासन पुजा नोंदणी ऑनलाईन पध्दतीने श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर https://online.shrituljabhavani.org उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
माहे जुलै २०२६ मधील सिंहासन पुजा ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येईल याची सर्व भाविक भक्त,महंत,पुजारी,सेवेकरी व नागरीकांनी नोंद घ्यावी. भाविकांनी सिंहासन पुजा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अधिकृत संकेतस्थळ https://online.shrituljabhavani .org यावर सिंहासन पुजा नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.
माहे जुलै - २०२६ या महिन्यात सिंहासन पूजेच्या नोंदणीसाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.भाविकांनी सिंहासन पूजेसाठी http://online. shrituljabhavani.org या लिंकवर प्रवेश करून भाविकांनी आपली सिंहासन पुजेची नोंदणी करावी.
सिंहासन पुजा नोंदणी १९ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजतापासून सुरू झाली आहे.ती २४ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजतापर्यंत करता येईल. ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने प्रथम सोडत व भाविकांना पेमेंटसाठी एसएमएस २७ जून २०२६ रोजी ११ वाजता पाठविण्यात येतील. भाविकांनी प्रथम सोडतीचे ऑनलाईन पेमेंट २७ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजतापासून ते २८ जूनपर्यंत सकाळी १० वाजतापर्यंत करावे.
सिंहासन संख्या पूर्ण न झाल्यास ऑनलाईन ड्रॉ पद्धतीने व्दितीय सोडत व भाविकांना पेमेंटसाठी २८ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत एसएमएस पाठविण्यात येतील.
भाविकांनी व्दितीय सोडतीचे ऑनलाईन पेमेंट २८ जून २०२६ रोजी सकाळी ११ ते २९ जून रोजी सकाळी १० वाजेपर्यंत करावे. प्रथम व व्दितीय फेरीत सिंहासन संख्या पूर्ण न झाल्यास ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने तृतीय सोडत व भाविकांना पेमेंटसाठी २९ जून रोजी सकाळी ११ वाजतापर्यंत एमएमएस पाठविण्यात येतील.
भाविकांनी तृतीय सोडतीचे ऑनलाईन पेमेंट २९ जून रोजी सकाळी ११ ते ३० जून रोजी सकाळी १० वाजतापर्यंत करावे.
माहे जुलै -२०२६ या महिन्यातील अंतीम सिंहासन पुजा बुकींग झाल्याची यादी ३० जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रसिध्द करण्यात येईल.
भाविकांनी वरीलप्रमाणे सिंहासन पुजा नोंदणीचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर, संस्थान तुळजापूरच्या व्यवस्थापक (प्रशासन) यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis