रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेतर्फे वृक्षारोपणाचे आयोजन
रत्नागिरी, 19 जून (हिं.स.) । येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेने २० जून ते २० जुलै हा ठेव वृद्धीमास घोषित केला असून त्यानिमित्ताने वृक्षारोपण करण्यात येणार आहे. पतसंस्थेने आकर्षक, विश्वासार्ह अशा ठेव योजना घोषित केल्या असून ठेवीदारांच्या स्व
अॅड दीपक पटवर्धन


रत्नागिरी, 19 जून (हिं.स.) । येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेने २० जून ते २० जुलै हा ठेव वृद्धीमास घोषित केला असून त्यानिमित्ताने वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

पतसंस्थेने आकर्षक, विश्वासार्ह अशा ठेव योजना घोषित केल्या असून ठेवीदारांच्या स्वागतासाठी स्वरूपानंदच्या सर्व शाखा, कार्यालय सज्ज झाली आहेत, अशी माहिती संस्थाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

या ठेववृद्धी मासात ठेवीदारांसाठी स्वरूपांजली ठेव योजना १२ ते १८ महिने, ९ टक्के ज्येष्ठ नागरिक व महिला, ८.७५ टक्के सर्वसाधारण व सोहम ठेव योजना १९ ते ३६ महिने (मासिक व्याज) ८.७५ टक्के ज्येष्ठ नागरिक व महिला, ८.५० टक्के सर्वसाधारण अशा योजना संस्थेने जाहीर केल्या आहेत.

सर्व स्तरावरील ठेवीदारांना उत्तम ठेव पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ज्येष्ठ नागरिक व महिला ठेवीदारांसाठी विशेष व्याजदराच्या योजना आखल्या आहेत. संस्थेच्या या ठेव योजनांना ठेवीदारांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन करताना संस्थेची उत्तम आर्थिक स्थिती, सातत्यपूर्ण वाढीव नफा, शून्य टक्के NPA, कर्जाचे प्रमाण, १६४ कोटींच्या बँक गुंतवणुका, ४१५ कोटींच्या ठेवी, २७

टक्के सीआरएआरचे प्रमाण अशा उत्तम स्थितीत पतसंस्था ठेवीदारांना ठेव ठेवण्यासाठी साद घालत आहे. या ठेव वृद्धीमासात ५० कोटीपर्यंत नव्या ठेवी जमा करण्याचे उद्दिष्ट संस्थेने निश्चित केले आहे. हे उद्दिष्ट पार करून ४५० कोटींचा टप्पा पूर्ण करून ५०० कोटी ठेव संकलनासाठीचे मार्गक्रमण सुरू केले जाईल असे ॲड. पटवर्धन म्हणाले.

आजपर्यंत संस्थेकडे २४ हजार ५८३ मुदत ठेव खाती आहेत. या ठेव वृद्धी मासात जेवढी खाती नव्याने उघडली जातील, तेवढ्या संख्येने वृक्षलागवड करण्याचा संस्थेचा उपक्रम आहे. संस्थेच्या लावलेल्या झाडांच्या संगोपनाचा व प्रतिवर्षी त्या झाडाचा वाढदिवस साजरा करण्याचा मनोदय आहे. धनवृद्धीइतकीच वृक्षवृद्धी महत्वाची हा संदेश देण्याच्या उद्देशाने वृक्ष लागवडीचे अभियान वृद्धीमासाशी जोडून हाती घेण्यात आला आहे. त्याला प्रतिसाद देण्याचे आवाहन अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande