शरद पवार गटाचे खासदार शिवसेनेत जाण्याची शक्यता नाही : आ.जानकर
सोलापूर, 19 जून (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील आमदार किंवा खासदार शिवसेनेत जाणार नाहीत, ते अधिक शक्यतेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटात जातील, असे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी म्हटले आहे. ठ
Uttam Jankar Solapur


सोलापूर, 19 जून (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील आमदार किंवा खासदार शिवसेनेत जाणार नाहीत, ते अधिक शक्यतेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटात जातील, असे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी म्हटले आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेतील खासदारांमध्ये फूट पडून सहा खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर, शरद पवार गटातील काही खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून ते शिवसेनेत जाण्याची चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर आमदार जानकर यांना विचारले असता त्यांनी या चर्चांना वेगळे वळण दिले.

“आमच्या पक्षाचे आमदार किंवा खासदार शिवसेनेत जाणार नाहीत. ते जाण्याची शक्यता असेल तर ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटात जातील,” असे त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अडचणीतून जात आहे. शरद पवारांचे वय आणि पक्षाची राजकीय गती लक्षात घेता आमदार-खासदारांसमोर विविध अडचणी आहेत. मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीत कोणीही फुटून विरोधकांकडे जाण्याची शक्यता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande