पुणे - ‘विकसित भारत जी राम जी’ अधिनियमासाठी जनजागृती अभियान
पुणे, 19 जून (हिं.स.)। ‘विकसित भारत जी राम जी’ अधिनियमाच्या तरतुदी, लाभ, कायदेशीर बळकटी तसेच ग्रामस्थांचे अधिकार व कर्तव्ये याबाबत जनजागृती करण्यासाठी पुणे जिल्ह्यात विशेष प्रचार व प्रसिद्धी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत २२ जूनपासून ग
collector dudi


पुणे, 19 जून (हिं.स.)। ‘विकसित भारत जी राम जी’ अधिनियमाच्या तरतुदी, लाभ, कायदेशीर बळकटी तसेच ग्रामस्थांचे अधिकार व कर्तव्ये याबाबत जनजागृती करण्यासाठी पुणे जिल्ह्यात विशेष प्रचार व प्रसिद्धी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत २२ जूनपासून ग्रामस्तर ते तालुका आणि जिल्हा स्तरापर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि अधिनियमाची सविस्तर माहिती तसेच उपलब्ध लाभांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, पदाधिकारी, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य, स्वयं-सहाय्यता गट, युवक मंडळे, आशा सेविका, महिला बचत गट, शेतकरी, मनरेगा कामगार आणि नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा. ‘विकसित भारत – रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) अधिनियम, २०२५’ विषयी सविस्तर माहिती मिळविण्याची ही महत्त्वाची संधी आहे.

या नव्या अधिनियमानुसार ग्रामीण विकास व ग्रामस्वराज्य मजबूत करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमाच्या ऐवजी नवीन कायदा लागू करण्यात आला आहे. या अधिनियमाचा उद्देश ग्रामीण कुटुंबांना रोजगाराची वैधानिक हमी देणे, शाश्वत ग्रामीण मालमत्ता निर्माण करणे, स्थानिक विकासाला चालना देणे आणि ‘विकसित भारत २०४७’ या राष्ट्रीय संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करणे हा आहे.

ग्रामपंचायतींना विकास नियोजनात अधिक सक्षम भूमिका देण्यात आली असून, याबाबत जनजागृतीसाठी डिसेंबर २०२५ मध्ये जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा घेण्यात आल्या असल्याची माहितीही प्रशासनाने दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande