
परभणी, 19 जून (हिं.स.)। तालुक्यातील धानोरा काळे ते देऊळगाव दुधाटे रस्त्याचे काम अर्धवट स्वरूपात अनेक दिवसापासून रखडलेले होते. याबाबत रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.
अनेक गावांना जोडणारा हा मुख्यरस्ता असल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत खराब अवस्थेत होता. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालक, शेतकरी, विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांत या मार्गावरून प्रवास करणे अत्यंत धोकादायक बनले होते. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम आतापर्यंत पूर्ण होणे गरजेचे होते. पण पावसाळ्याच्या तोंडावर अखेरस्त्याच्या कामाला सुरुवात झाली.
-खेड्यापाड्यात रस्त्याची अवस्था जैसे थे
परभणी जिल्ह्यात असे अनेक गावे आहेत की त्यांना रस्त्याअभावी यातना भोगाव्या लागतात. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू होत आहेत काही गावांना चिखलातून रस्ता शोधावा लागतो. शहरी भागातील रस्ते दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर केले जाते. मात्र ग्रामीण भागातील रस्त्याचे काम अनेक दिवस रेंगाळत का राहते.
ग्रामीण भागातील खराब रस्त्यांमुळे दळणवळण, शेतमाल वाहतूक आणि आरोग्य या बाबीचा विचार केला तर नागरिकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नाकडे जिल्हा प्रशासन असो की लोकप्रतिनिधी यांनी काळजीने लक्ष देण्याची गरज आहे.
________
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis