जालना येथे देवगिरी सहकारी बँकेच्या ३४ व्या शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 19 जून (हिं.स.)। जालना येथे देवगिरी सहकारी बँकेच्या ३४ व्या शाखेचा उद्घाटन सोहळा भाजपाचे नेते रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी बँकेची विश्वासार्हता, सातत्यपूर्ण सेवा आणि ग्राहकांप्रती असलेले सहकार्य याविषयी
अ


छत्रपती संभाजीनगर, 19 जून (हिं.स.)। जालना येथे देवगिरी सहकारी बँकेच्या ३४ व्या शाखेचा उद्घाटन सोहळा भाजपाचे नेते रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी बँकेची विश्वासार्हता, सातत्यपूर्ण सेवा आणि ग्राहकांप्रती असलेले सहकार्य याविषयी खातेदारांना मार्गदर्शन केले. तसेच बँकेने भविष्यातही अशीच उत्तरोत्तर प्रगती करत जनतेचा विश्वास अधिक दृढ करावा, अशा शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर, आमदार प्रसाद लाड, आमदार नारायण कुचे, महापौर वंदना मगरे, राजेश राऊत, भास्कर आबा दानवे, बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे, जालना जिल्ह्याचे जिल्हा संघचालक डॉ. नितीन खंडेलवाल, नगरसेवक, बँकेचे संचालक मंडळ तसेच मोठ्या संख्येने नागरिक व खातेदार उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande