
छत्रपती संभाजीनगर, 19 जून (हिं.स.)। आमदार संतोष दानवे यांच्या उपस्थितीत ‘जनता दरबार’ संपन्न झाला. जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याचे सांगण्यात आले. भोकरदन येथील निवासस्थानी नेहमीप्रमाणे मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या.
यावेळी उपस्थित नागरिकांनी विविध प्रलंबित प्रश्न आणि आपल्या भागातील अडीअडचणी मांडल्या. जनतेच्या समस्या प्रत्यक्ष समजून घेत, काही स्थानिक प्रश्नांचा जागेवरच तातडीने निपटारा केला. तसेच इतर तांत्रिक व प्रशासकीय अडचणींसंदर्भात संबंधित विभागाच्या शासकीय अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून योग्य ते निर्देश दिले असून, ही कामे विनाविलंब मार्गी लावण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत.
नागरिकांचे प्रश्न सोडवणे आणि मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणे हीच माझी प्राथमिकता आहे. जनता जनार्दनाची सेवा करण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis