स्त्री फक्त घर सांभाळणारी नाही, तर घर उभं करणारी आहे : दिनकर पाटील
स्त्री शक्ती महिला मेळाव्यातून महिलांना मिळाले हक्काचे व्यासपीठ नाशिक, 02 जून (हिं.स.)। महाराष्ट्राची संस्कृती ही स्त्रीप्रधान आहे. जिजाऊंनी शिवराय घडवले, सावित्रीबाईंनी शिक्षणाची मशाल पेटवली, अहिल्याबाईंनी राज्य चालवलं. त्याच मातीतल्या तुम्ही आह
A woman is not just a


स्त्री शक्ती महिला मेळाव्यातून महिलांना मिळाले हक्काचे व्यासपीठ

नाशिक, 02 जून (हिं.स.)। महाराष्ट्राची संस्कृती ही स्त्रीप्रधान आहे. जिजाऊंनी शिवराय घडवले, सावित्रीबाईंनी शिक्षणाची मशाल पेटवली, अहिल्याबाईंनी राज्य चालवलं. त्याच मातीतल्या तुम्ही आहात. तुम्ही फक्त घर सांभाळणाऱ्या नाही, तर घर उभं करणाऱ्या आहात. कुठल्याही स्त्रीवर अन्याय होत असेल तर सर्वांनी एकत्रित होऊन लढा देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन दिनकर आण्णा पाटील यांनी केले. नाशिक मध्ये प्रथमच स्त्री शक्ती महिला महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. दीड हजाराहून अधिक महिला मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या.भव्य महामेळाव्याचे आयोजन क्रिएटिव्ह माईंड्स मीडिया सर्व्हिसेसचे संचालक जितेंद्र येवले पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष मीनल कुलकर्णी यांनी केले. या मेळाव्यात महिलांचे आरोग्य या विषयावर अशोका हॉस्पिटलचे स्त्री रोग तज्ञ डॉक्टर मनीषा कापडणीस आणि डॉक्टर संदीप सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.आर्थिक साक्षरता विषयावर एचडीएफसी बँक लिमीटेडचया अश्विनी दसरे तसेच अर्थकला म्युच्युअल फायनान्स तर्फे संदीप महाजन यांनी मार्गदर्शन केले.महिलांसाठीचे कायदे या संदर्भात ऍड शोभा पवार यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. आजच्या काळात वाढते स्थूल तेचे प्रमाण आणि नैसर्गिक सौंदर्य याबद्दल डॉक्टर वर्षा चिट्टीवाड मार्गदर्शन केले. 33 उद्योजीकांनी त्यांच्या व्यवसायासंदर्भात माहिती दिली. नगरसेवक दिनकर पाटील, नगरसेविका सौ सीमा पवार, अशोका वुमन्स अँड चिल्ड्रेन्स हॉस्पिटल चे डायरेक्टर डॉ. सुशील पारख, चौधरी यात्रा कंपनीच्या संचालिका राजकुमारी चौधरी, एचडीएफसी बँकेच्या ब्रांच मॅनेजर अश्विनी दसरे, जर्मन गुरुकुल च्या विद्या पींगळे, उद्योजिका रितिका कलानी व्यासपीठावर उपस्थित होत्या.भव्य लकी ड्रॉ च्या माध्यमातून ब्युटी झोन यांच्याकडून तीन व्हॅनिटी बॅग, दिनेश टेक्स्टाईल मार्केट 21 पैठण्या, दंडे गोल्ड अँड डायमंड यांच्यावतीने पाच चांदीची नाणी, सोन्याची नथ अशी भरघोस बक्षीसे वितरित करण्यात आली. आणि इतर उपस्थित सर्व महिलांना भेटवस्तू देण्यात आले.

या कार्यक्रमासाठी डॉ. सुषमा दुगड, स्वाती ब्राह्मणकर, प्रदीप कुलकर्णी, रेखा कोतकर, गायत्री लचके, पुष्पलता ठाकूर, कल्पना कुलकर्णी,स्वप्निल नेरे शरद पवार ,ऋचा कुलकर्णी, तृप्ती ढवण, दीप्ती येवले यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी अशोका वुमन्स अँड चिल्ड्रन हॉस्पिटल, एचडीएफसी बँक चौधरी यात्रा कंपनी प्रा. लि. सपट इंटरनॅशनल प्रा. लि, अर्थकला फायनान्शिअल लिमिटेड यांचे अनमोल सहकार्य लाभले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande