अमरावतीत आरोग्य व शिक्षण सुविधांचा आयुक्त वर्षा लड्डा यांचा आढावा
अमरावती, 2 जून (हिं.स.) : अमरावती महानगरपालिकेच्या आरोग्य व शैक्षणिक सेवांना अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि नागरिकाभिमुख बनविण्यासाठी महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी सोमवारी शहरातील विविध दवाखाने आणि शाळांची पाहणी करून तेथील सुविधा, स्वच्छता व
आरोग्य व शिक्षण सुविधांच्या बळकटीकरणासाठी आयुक्त वर्षा लड्डा यांची विविध ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी


अमरावती, 2 जून (हिं.स.) : अमरावती महानगरपालिकेच्या आरोग्य व शैक्षणिक सेवांना अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि नागरिकाभिमुख बनविण्यासाठी महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी सोमवारी शहरातील विविध दवाखाने आणि शाळांची पाहणी करून तेथील सुविधा, स्वच्छता व्यवस्था आणि कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.

या पाहणी दौऱ्यात आयसोलेशन दवाखाना, महानगरपालिका शाळा जेवड, महानगरपालिका शाळा बडनेरा तसेच मोदी हॉस्पिटलचा समावेश होता. दौऱ्याची सुरुवात आयसोलेशन दवाखान्यापासून करण्यात आली. यावेळी आयुक्तांनी रुग्णांसाठी उपलब्ध वैद्यकीय सुविधा, उपचार व्यवस्था, औषधसाठा, मनुष्यबळाची उपलब्धता आणि स्वच्छता व्यवस्थेची तपासणी केली.

दवाखान्यातील विविध विभागांना भेट देत त्यांनी डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. रुग्णांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी यासाठी अधिक जबाबदारीने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच दवाखाना परिसरातील स्वच्छता राखण्याबरोबरच आवश्यक सुविधांच्या बळकटीकरणावर भर देण्याचे निर्देश दिले.

शाळा इमारतींच्या दुरुस्ती व विकासकामांवर भर

आयसोलेशन दवाखाना परिसरातील महानगरपालिका शाळेची पाहणी करताना इमारतीच्या दुरुस्तीची गरज असल्याचे निदर्शनास आले. यानंतर बांधकाम विभागाने तातडीने नियोजन करून आवश्यक दुरुस्तीची कामे सुरू करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

त्यानंतर महानगरपालिका शाळा जेवड येथे भेट देऊन त्यांनी शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा आणि विकासकामांचा आढावा घेतला. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सुरू असलेल्या बांधकामाच्या गुणवत्तेची तपासणी करताना कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

जेवड येथील शाळा भविष्यात अमरावती जिल्ह्यातील आदर्श आणि उत्कृष्ट शाळा म्हणून विकसित व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करत संबंधि

--------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande