धुळे - एक्सप्रेस कॅनॉलच्या दुरुस्तीसाठी तीव्र आंदोलन
धुळे , 02 जून, (हिं.स.) शेतकर्यांना वेठीस धरणार्या भ्रष्ट अधिकार्यांना पाठीशी घालणार्या सरकारचा धिक्कार असो..! अशा घोषणा देत आज भाजपाचे माजी जि.प. सभापती संग्राम पाटील, मा.प्रवेे संजय शर्मा यांनी जोरदार घोषणाबाजीसह एक्सप्रेस कॅनोलच्या दुरुस्तीसाठी
धुळे - एक्सप्रेस कॅनॉलच्या दुरुस्तीसाठी तीव्र आंदोलन


धुळे , 02 जून, (हिं.स.) शेतकर्यांना वेठीस धरणार्या भ्रष्ट अधिकार्यांना पाठीशी घालणार्या सरकारचा धिक्कार असो..! अशा घोषणा देत आज भाजपाचे माजी जि.प. सभापती संग्राम पाटील, मा.प्रवेे संजय शर्मा यांनी जोरदार घोषणाबाजीसह एक्सप्रेस कॅनोलच्या दुरुस्तीसाठी आंदोलन केले. यावेळी संग्राम पाटील यांनी थेट अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्म दहन करण्याचा देखील प्रयत्न केला. सुदैवाने पोलीसांनी तत्काळ हस्तक्षेप करीत त्यांच्याकडील कॅन हिसकावून घेत त्यांना रोखल्याने कोणताही अनुचीत प्रकार घडला नाही. परंतू गेल्या अनेक दिवसांपासून शेतकर्यांच्या प्रश्नावर प्रशासनाकडे पाठपुरावा करुन देखील न्याय मिळत नसल्याने स्वपक्षीय सरकारचा निषेध आणि धिक्कार करण्याची वेळ आल्याने तीव्र रोष व्यक्त करुन संग्राम पाटील व संजय शर्मा यांनी एक प्रकारे भाजप सरकारला आज घरचा आहेर दिला.

मौजे उडाणे व गोताणे ता.धुळे येथील ए३सप्रेस कॅनॉलची तात्काळ दुरुस्ती, संरक्षण भिंत उभारणी, पाईप मोरी, पुल बांधकाम, रस्ता दुरुस्ती करण्यात यावी आणि शेतकर्यांच्या जीवीताची आणि मालमत्तांच्या संरक्षणासाठी निवेदन देत संबंधित पाटबंधारे व सिंचन विभागाकडे जिल्हा परिषदेचे माजी सभापती संग्राम पाटील हे पाठपुरावा करीत आहेत. या कामाला शासकीय मंजूरी देण्यावर कोणतीही कार्यवाही होत नसल्याने अखेर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन आंदोलन करण्याचे जाहिर केले, त्यानुसार आज सकाळी उडाणे व गोताणे परीसरातील शेतकर्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी हातात ज्वलनशील पदार्थ असलेली कॅन घेवून ते दाखल झाले होते. त्यांना प्रवेशव्दाराजवळ पोलीसांनी रोखले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. शेतकर्यांना वेठीस धरणार्या भ्रष्ट अधिकार्यांचे करायचे काय, भ्रष्ट नालायक अधिकार्यांचा धिक्कार असो. या भ्रष्ट अधिकार्यांना पाठीशी घालणार्या सरकारचा धिक्कारअसो.. अशा प्रकारच्या जोरदार घोषणांनी परीसर दणाणून गेला होता. अखेर पोलीसांनी संग्राम पाटील यांच्याकडील कॅन हिसकावून घेत त्यांना ताब्यात घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande