लघुलेखन मराठी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता ३१ जुलैपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन
पुणे, 02 जून, (हिं.स.)। छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,औंध येथे स्टेनोग्राफी मराठी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्याकरिता https://msbavot.edu.in या संकेतस्थळावर ३१ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाईनपद्धतीने नोंदणी करावी. इच्छुक उमेदवारांन
लघुलेखन मराठी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता ३१ जुलैपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन


पुणे, 02 जून, (हिं.स.)। छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,औंध येथे स्टेनोग्राफी मराठी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्याकरिता https://msbavot.edu.in या संकेतस्थळावर ३१ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाईनपद्धतीने नोंदणी करावी. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाकडून २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाकरिता २४ क्षमतेच्या मर्यादेत लघुलेखन मराठी या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रकिया राबविण्यास मान्यता मिळालेली आहे. या अभ्यासक्रमाकरिता ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत तसेच प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रत संस्थेमध्ये ३१ जुलै पर्यंत जमा करणे आवश्यक आहे.

गुणवत्ता यादी १ ऑगस्ट रोजी तयार करण्यात येणार असून प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही ४ ऑगस्ट संस्थेच्या मुख्य इमारतीच्या कौशल्य सभागृहामध्ये होणार आहे व प्रवेशित उमेदवारांचे नियमित प्रशिक्षण ६ ऑगस्ट पासून सुरु होणार आहे, अशी माहिती उपप्राचार्य अ.अं. साबळे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande