परभणीत शासकीय वाहनांच्या वापराबाबत लोकशासन आंदोलन पार्टीचे निदर्शने
परभणी, 2 जून (हिं.स.) : शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासकीय कामकाजासाठी खाजगी वाहनांचा वापर टाळून शासनाने उपलब्ध करून दिलेल्या अधिकृत वाहनांचाच वापर करावा, तसेच जनतेच्या पैशांची होणारी उधळपट्टी थांबवावी, या मागणीसाठी लोकशासन आंदोलन पार्टीच्या व
परभणीत शासकीय वाहनांच्या वापराबाबत लोकशासन आंदोलन पार्टीचे निदर्शने


परभणी, 2 जून (हिं.स.) : शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासकीय कामकाजासाठी खाजगी वाहनांचा वापर टाळून शासनाने उपलब्ध करून दिलेल्या अधिकृत वाहनांचाच वापर करावा, तसेच जनतेच्या पैशांची होणारी उधळपट्टी थांबवावी, या मागणीसाठी लोकशासन आंदोलन पार्टीच्या वतीने सोमवारी परभणी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने आंदोलनकर्त्यांनी कोणतीही घोषणाबाजी न करता शांततेच्या मार्गाने आपला निषेध नोंदवला. या आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन काळे यांनी केले.

आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की, काही शासकीय अधिकारी आणि कर्मचारी शासकीय कामांसाठी खाजगी वाहनांचा वापर करत आहेत, ज्यामुळे शासनाच्या निधीवर अनावश्यक आर्थिक भार पडत आहे आणि सार्वजनिक पैशांचा अपव्यय होत आहे.

शासकीय वाहनांचाच वापर करण्याची मागणी

शासकीय कामांसाठी केवळ अधिकृत शासकीय वाहनांचाच वापर बंधनकारक करण्यात यावा, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. याबाबतचे निवेदन तहसीलदार कार्यालयाला सादर करण्यात आले.

या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते नितीन रण्हेर, गणेश पवार, दत्ता काळे तसेच लोकशासन आंदोलन पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande