सोलापुरात भाजप-काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने
सोलापूर, 02 जून (हिं.स.)। विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाल्याने काही काळ राजकीय वातावरण तापले होते. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्
fgdf


सोलापूर, 02 जून (हिं.स.)। विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाल्याने काही काळ राजकीय वातावरण तापले होते. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. उमेदवारी अर्जांच्या छाननी प्रक्रियेदरम्यान विविध हरकती आणि राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झाले होते.

यावेळी भाजप आणि काँग्रेस समर्थकांनी आपल्या-आपल्या पक्षाच्या समर्थनार्थ घोषणा देत शक्तिप्रदर्शन केले. दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत दोन्ही गटांना शांत राहण्याचे आवाहन केले. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. पोलिसांच्या सतर्कतेमुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली आणि कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. विधान परिषद निवडणुकीतील वाढत्या राजकीय चुरशीमुळे आगामी दिवसांत राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

. ---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande