सोलापूर बसस्थानकात हाऊसकीपिंग व मेकॅनाइज्ड बस वॉशिंग प्रकल्पाचा शुभारंभ
सोलापूर, 02 जून (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर बसस्थानक येथे हाऊसकीपिंग आणि मेकॅनाइज्ड बस वॉशिंग प्रकल्पाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट
st


सोलापूर, 02 जून (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर बसस्थानक येथे हाऊसकीपिंग आणि मेकॅनाइज्ड बस वॉशिंग प्रकल्पाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून राबविण्यात येणारा हा प्रकल्प १ जून २०२६ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आला. उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून विभाग नियंत्रक अमोल गोंजारी, आगार व्यवस्थापक उत्तम जोंधळे, नागेश जाधव तसेच अंजुलगीकर उपस्थित होते. यावेळी MSRTC चे अधिकारी, कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून नव्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने विभागीय व्यवस्थापक प्रसाद गोसावी, सहाय्यक विभागीय व्यवस्थापक शिवदास भंडारे, पर्यवेक्षिका सुप्रिया सुतकर तसेच हाऊसकीपिंग विभागातील कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन झाल्यानंतर सोलापूर बसस्थानकात हाऊसकीपिंग आणि मेकॅनाइज्ड बस वॉशिंग सेवांचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. या आधुनिक प्रकल्पामुळे बसस्थानक परिसराची स्वच्छता अधिक प्रभावीपणे राखली जाणार असून प्रवाशांना अधिक स्वच्छ व दर्जेदार सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तसेच बसच्या स्वच्छतेच्या दर्जातही लक्षणीय सुधारणा अपेक्षित आहे. कार्यक्रमाच्या शेवटी प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सहकार्य करणाऱ्या MSRTC प्रशासन, अधिकारी, कर्मचारी तसेच Smart Services Pvt. Ltd. च्या संपूर्ण टीमचे आभार व्यक्त करण्यात आले. नव्या उपक्रमामुळे सोलापूर बसस्थानकाच्या स्वच्छता व्यवस्थेला आधुनिकतेची जोड मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. ---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande