परभणीत चक्री वादळी वाऱ्यामुळे सोलार पंपांचे मोठे नुकसान
वडगाव सुक्रे परिसरात शेतीसाठी पाणीपुरवठा ठप्प; नवीन सोलार प्लेट देण्याची मागणी परभणी, 2 जून (हिं.स.) : परभणी तालुक्यातील वडगाव सुक्रे येथे झालेल्या चक्री वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या सोलार पंप यंत्रणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पिके आण
वादळी वार्याने वडगाव सुक्रे येथील शेतकर्याच्या सोलार पंपाचे नुकसान


वडगाव सुक्रे परिसरात शेतीसाठी पाणीपुरवठा ठप्प; नवीन सोलार प्लेट देण्याची मागणी

परभणी, 2 जून (हिं.स.) : परभणी तालुक्यातील वडगाव सुक्रे येथे झालेल्या चक्री वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या सोलार पंप यंत्रणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पिके आणि जनावरांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

या वादळाचा फटका शेतकरी बालासाहेब हरीचंद्र सुक्रे यांच्या शेतातील सोलार पंपाला बसला. गट क्रमांक 302 मधील सोलार पंपाच्या पाट्या, बॉडी तसेच संपूर्ण स्ट्रक्चरचे मोठे नुकसान झाले असून संपूर्ण यंत्रणा निकामी झाली आहे.

घटनेनंतर वडगाव सुक्रे ग्रामपंचायत प्रशासनाने घटनास्थळी जाऊन पंचांसमक्ष पाहणी केली. पंचनाम्यानुसार सोलार पंपाच्या संरचनेचे शंभर टक्के नुकसान झाल्याचे नोंदवण्यात आले आहे.

या नुकसानीमुळे शेतातील पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला असून शेतकऱ्यांना पिके व जनावरांसाठी पाण्याचा मोठा तुटवडा जाणवत आहे.

कंपनीकडून तात्काळ मदतीची मागणी

संबंधित सोलार कंपनीच्या प्रतिनिधींनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी करावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नवीन सोलार प्लेट तसेच आवश्यक साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

शेतकरी बालासाहेब सुक्रे यांनीही प्रशासन आणि कंपनीकडे तातडीच्या मदतीची मागणी करत नुकसान भरपाई व नवीन उपकरणांची उपलब्धता करण्याचे आवाहन केले आहे.

वादळामुळे झालेल्या या नुकसानीमुळे परिसरातील इतर शेतकरीही चिंतेत असून शेतीतील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची गरज व्यक्त केली जात आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande