अमरावती : धारणी तालुक्यात जोरदार वादळी तांडव; 150 पेक्षा अधिक गावात अंधार
अमरावती, 02 जून (हिं.स.) । जवळच्या अनेक गाव शिवारात सोमवारच्या रात्री जोरदार वादळासह तुफानी पाऊस कोसळल्याने सर्वत्र दाणादाण उडाली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे तार तुटले तर पोल वाकले. त्यामुळे तालुक्यातील १५० पेक्षा अधिक गावे विज पुरवठा खंड
धारणी तालुक्यात जोरदार वादळी तांडव 150 पेक्षा अधिक गावात अंधार


अमरावती, 02 जून (हिं.स.) । जवळच्या अनेक गाव शिवारात सोमवारच्या रात्री जोरदार वादळासह तुफानी पाऊस कोसळल्याने सर्वत्र दाणादाण उडाली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे तार तुटले तर पोल वाकले. त्यामुळे तालुक्यातील १५० पेक्षा अधिक गावे विज पुरवठा खंडित झाल्याने अंधारात बुडाली आहे. कुसुमकोट ते भोकरबर्डी हाय वे वर 15 ते 20 झाडे पडलेली होती. अर्धा तास बऱ्हाणपूर आणि खंडवा वाहतूक बंद होती.

गंभीरता लक्षात घेता माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीपाल पाल यांनी आपल्या जे सीबीने रोडवरील झाडे हटवून रस्ता मोकळा केला. रविवारी पहाटे सुद्धा वादळाने अनेक झाडांची पडखड झालेली होती.विशेष असे की, सार्वजनिक बांधकाम विभाग आपल्या रोडवरील जाम मोकळा करत नाही, विजेचे तार अनेक ठिकाणी तुटलेले असल्याने धारणी उप केंद्रातील 150 गावे अंधारात बुडालेली आहेत, बातमी लिहे पर्यंत अनेक गावातील वीज आलेली नव्हती. विशेष म्हणजे मेळघाट परिसरात गेल्या दोन दिवसांपासून प्री-मान्सून पावसाने जोरदार हजेरी लावत संपूर्ण परिसर अक्षरशः झोडपून काढला. रात्री सुमारे २ वाजल्यापासून रविवारला पहाटे ५ वाजेपर्यंत वीजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्याने अनेक भागात पाणीच पाणी झाले होते.अचानक झालेल्या या दमदार पावसामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. मेळघाटातील धारणी, चिखलदरा तसेच ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये पावसाचा मोठा प्रभाव पाहायला मिळाला. काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. मुसळधार पावसामुळे लहान-मोठ्या नदी-नाल्यांना पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. डोंगराळ भागातील ओढे आणि नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने परिसरातील वन्यप्राणी तसेच पाळीव जनावरांना मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande