सोलापूर - थकीत ऊस बिलासाठी शेतकरी आक्रमक; अर्धनग्न आंदोलनाचा इशारा
सोलापूर, 2 जून, (हिं.स.)। दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगर्स लिमिटेड कडील थकीत ऊस बिलाच्या प्रश्नावरून शेतकरी आक्रमक झाले असून, गेल्या आठ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. मात्र, या आंदोलनाची प्रादेशिक साखर क
sugar mill


सोलापूर, 2 जून, (हिं.स.)। दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगर्स लिमिटेड कडील थकीत ऊस बिलाच्या प्रश्नावरून शेतकरी आक्रमक झाले असून, गेल्या आठ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. मात्र, या आंदोलनाची प्रादेशिक साखर कार्यालयाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी गुरुवारी (४ जून) अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.शेतकरी संघटनांच्या म्हणण्यानुसार, कारखान्याकडे सुमारे २८०० रुपये प्रतिटन इतकी ऊस बिलाची थकबाकी आहे. ही रक्कम व्याजासह तातडीने अदा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जोपर्यंत संपूर्ण थकीत रक्कम मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी स्पष्ट केली आहे.

दरम्यान, साखर आयुक्तांनी १५ मे रोजी गोकुळ शुगर्सवर आरआरसी (महसूल वसुली) कारवाई केली होती. मात्र, त्यानंतरही शेतकऱ्यांना थकीत रकमेबाबत कोणताही दिलासा मिळालेला नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.गेल्या पाच महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालय, साखर आयुक्त कार्यालय आणि संबंधित कारखाना प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही न्याय मिळालेला नाही, अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे आता आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार शेतकरी संघटनांनी केला असून, थकीत बिलाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande