
नाशिक, 02 जून (हिं.स.)।वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठानतर्फे आयोजित राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशन, ‘भूषणम्’ पुरस्कार सोहळा आणि पदवीदान समारंभ गंगापूर रोड येथील शंकराचार्य संकुलात उत्साहात पार पडला.कार्यक्रमात डॉ. नरेंद्र सहस्त्रबुद्धे यांना ‘वास्तुभूषण’ तर दीपक वाघ यांना ‘ज्योतिष भूषण’ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. अधिवेशनाचे उद्घाटन ज्योतिषाचार्य लक्ष्मीकांत जोशी यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमात विविध विषयांवरील मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात आली. डॉ. कुलभूषण मंगळे यांनी विवाहयोग, डॉ. नरेंद्र सहस्त्रबुद्धे यांनी वास्तुशास्त्र, अजय दीक्षित यांनी शकुनविचार, सौ. पद्मश्री पेटकर यांनी रत्नशास्त्र, तर ज्योतिषाचार्य हर्षद महाजन यांनी नोकरी व व्यवसाय या विषयांवर मार्गदर्शन केले.वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठानचा उच्चस्तरीय ‘ज्योतिष भूषण’ अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या ६६ विद्यार्थ्यांना ‘ज्योतिष भूषण’ पदवी प्रदान करण्यात आली. तसेच इतर विविध अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या १७७ विद्यार्थ्यांना ‘ज्योतिष प्रबोध’, ‘ज्योतिष विशारद’, ‘ज्योतिष प्रवीण’ आणि ‘कृष्णमूर्ती विशारद’ या पदव्या देऊन गौरविण्यात आले.या सोहळ्यास सुमारे ३०० हून अधिक विद्यार्थी व ज्योतिषप्रेमी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष व ग्रंथकर्ते ‘ग्रंथभूषणम्’ भूषण महाजन, ज्योतिषाचार्य हर्षद महाजन, प्रतिभा रमेश महाजन, कोषाध्यक्ष किरण क्षत्रिय, सौ. भार्गवी भूषण महाजन, भूषण पाटील, प्रशांत पैठणे, सौ. नूतन रहाळकर, सारिका ठोंबरे, कैवल्य दीक्षित आणि तेजस क्षेमकल्याणी यांनी विशेष परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV