
नाशिक, 02 जून (हिं.स.)। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी केलेल्या विधानामुळे शिवसेनेमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. तर शिवसैनिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे पक्षांमध्ये नवीनच वाद सुरू झाला असून आता या वादाचा शेवट काय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
नाशिक मध्ये विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी मतदान होत आहे या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा सोमवारी शेवटचा दिवस होता या दिवशी शेवटपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने माजी आमदार अनिल कदम आणि माजी आमदार वसंत गीते हे दोघेही इच्छुक होते परंतु या मतदारसंघाची राजकीय परिस्थिती बघितली तर या मतदारसंघांमध्ये महायुतीचे पारडे जड होते आणि या ठिकाणी महायुतीच्या वतीने ही जागा शिवसेना शिंदे गटाला सोडण्यात आलेली होती त्या ठिकाणी शिंदे गटाने माजी आमदार नरेंद्र दराडे यांना उमेदवारी दिलेली होती त्यामुळे घोडेबाजार जोरात होणार यामध्ये काही शंकाच नव्हती जरीही महायुतीकडे बहुमत होतं तरी देखील घोडेबाजारावरती आजच जी चर्चा सुरू आहे ती बघितल्यानंतर कोणी उमेदवारी करेल अशी परिस्थिती नाही.
हे सर्व घडत असताना ज्यावेळी विधान परिषदेची निवडणूक घोषित झाली त्यावेळी नाशिकची जागा ही भाजपाला पाहिजे होती भाजप व त्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होता विशेष करून भाजपाचे गिरीश महाजन समर्थक माजी नगरसेवक गणेश गीते हे मोठ्या प्रमाणावर ती प्रयत्न करत होते त्यांच्याच बरोबरीने भाजपाचे उपाध्यक्ष आणि महाजन समर्थक निलेश बोरा देखील या निवडणुकीसाठी प्रयत्न करत होते. पण जागा वाटपाची चर्चा करत असताना नाशिकची जागा ही शिवसेनेला सुटल्यानंतर गणेश गीते हे प्रचंड नाराज झाले आणि त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली यावर गणेश गीते म्हणाले की , आम्ही किती दिवस थांबायचं आणि आम्हाला जर कधी संधीच मिळणार नसेल तर मग बंडखोरी केली तर वाव काय असा प्रश्न उपस्थित करून गीते यांनी बंडखोरीचा निशान फडकवलेला आहे.
हे सर्व घडत असताना सोमवारी ज्यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली त्यानंतर काही मिनिटातच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नाशिक संपर्क नेता रवींद्र मिरलेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना या निवडणुकीत पासून लांब राहणारा असल्याचे सांगितले आमच्या पक्षात कोणीही सक्षम नेतृत्व नाही अशीही पुष्टी त्यांनी जोडली म्हणजेच त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील शिवसेनेमध्ये कोणीही सक्षम नाही असे सांगून आत्तापर्यंत पक्ष वाढीसाठी ज्या नेत्यांनी प्रयत्न केले जे कार्यकर्ते शिवसेना वाढावी आणि सक्षम व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे त्यांना मोठा झटका दिला हे वाक्य बोलत असताना मात्र रवींद्र मिरलेकर काल-परवापर्यंत शिवसैनिकच शिवसेनेचा कणा आहे अशा स्वरूपाचं भाषण वेगवेगळ्या मेळाव्यांमध्ये करत होते याचा विसर पडला असेल परंतु आपण काय बोलतो आहे हे रवींद्र मिरलेकरांच्या यदाकदाचीच लक्षात आलेल्या दिसत नाही त्यांच्या या सक्षम नेतृत्वाचा मुद्दा अनेक शिवसेना नेत्यांच्या जिव्हारी लागला असून अनेक शिवसैनिक देखील नाराज झालेले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची अवस्था अजूनच बिकट होते की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV