आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर विराट आणि अनुष्काने घेतेले प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद
वृंदावन, 02 जून (हिं.स.) विराट कोहलीच्या आरसीबीने नुकतेच आपले दुसरे आयपीएल विजेतेपद पटकावले. नेहमीप्रमाणेच, अनुष्का शर्मा आरसीबी आणि विराट कोहलीला पाठिंबा देण्यासाठी आली होती. आता, आपले दुसरे विजेतेपद जिंकल्यानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा थेट
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा


वृंदावन, 02 जून (हिं.स.) विराट कोहलीच्या आरसीबीने नुकतेच आपले दुसरे आयपीएल विजेतेपद पटकावले. नेहमीप्रमाणेच, अनुष्का शर्मा आरसीबी आणि विराट कोहलीला पाठिंबा देण्यासाठी आली होती. आता, आपले दुसरे विजेतेपद जिंकल्यानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा थेट प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाला भेट दिली..

विराट आणि अनुष्का यांनी वृंदावनमधील आध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाला भेट दिली. या दोघांनी प्रेमानंद महाराजांच्या राधा केली कुंज आश्रमाला भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. अनुष्का आणि विराटचे अनेक फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये, विराट आणि अनुष्का आध्यात्मिक गुरूंना भेटल्यानंतर आश्रमातून बाहेर पडताना दिसत आहेत.

गेल्या काही वर्षांत, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी अनेकदा वृंदावनला भेट देऊन प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले आहेत. या जोडप्याने त्यांच्या आयुष्यात अध्यात्माच्या महत्त्वाविषयी अनेकदा सांगितले आहे आणि त्यांना अनेक धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिले गेले आहे.

आरसीबीने सलग दुसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावल्यानंतर, अनुष्काने मैदानावर आणि मैदानाबाहेरही आनंद साजरा केला. यामध्ये अनुष्काच्या सोशल मीडिया पोस्ट्स आणि डान्स व्हिडिओंचा समावेश होता. आरसीबीने अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला पाच गडी राखून पराभूत करून आपली सलग दुसरी ट्रॉफी जिंकली.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande