रत्नागिरीचा महेश मिलके स्विमिंग ग्रुप कराडमध्ये ओव्हरऑल चॅम्पियन
रत्नागिरी, 2 जून (हिं.स.) । उंब्रज (कराड) येथे जिजामाता स्विमिंग पूल व हेल्थ क्लबने विभागीय निमंत्रित जलतरण स्पर्धेचे आयोजन केले होते. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत रत्नागिरीच्या महेश मिलके स्विमिंग ग्रुपच्या २५ खेळाडूंनी विविध वयोगटांत भाग घेत३५४ गुण
महेश मिलके स्विमिंग ग्रुप


रत्नागिरी, 2 जून (हिं.स.) । उंब्रज (कराड) येथे जिजामाता स्विमिंग पूल व हेल्थ क्लबने विभागीय निमंत्रित जलतरण स्पर्धेचे आयोजन केले होते. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत रत्नागिरीच्या महेश मिलके स्विमिंग ग्रुपच्या २५ खेळाडूंनी विविध वयोगटांत भाग घेत३५४ गुणांसह ओव्हरऑल चॅम्पियन ट्रॉफी जिंकून एकतर्फी विजय मिळविला.

या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे 'स्पेशल चाइल्ड' गटात रत्नागिरीच्या दोन जिद्दी खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर प्रत्येकी २ रौप्य पदकांची कमाई केली. त्यांच्या या यशाने संपूर्ण रत्नागिरीकरांची मान अभिमानाने उंचवली आहे. ते खेळाडू असे - त्रिशा भुजबळराव: २ रौप्य पदक

श्रीपाद मयेकर: २ रौप्य पद

स्पर्धेत रत्नागिरीच्या खेळाडूंनी वैयक्तिक कामगिरीत कमालीचे सातत्य राखले. पाच खेळाडूंनी आपापल्या गटात 'वैयक्तिक चॅम्पियनशिप' पटकावली. ते खेळाडू असे - १. नाझीफा मंगा (मास्टर्स गट): ४ सुवर्ण पदकांसह वैयक्तिक चॅम्पियनशिप. २. तनया मिलके (ओपन गट): ४ सुवर्ण पदकांसह वैयक्तिक चॅम्पियनशिप. ३. आयुष काळे (१७ वर्षांखालील): १ सुवर्ण, २ रौप्य, १ कास्य पदकासह (विभागून) वैयक्तिक चॅम्पियनशिप. ४. निधी भिडे (१५ वर्षांखालील): ३ सुवर्ण, १ रौप्य पदकासह वैयक्तिक चॅम्पियनशिप. ५. अधीश जाधव (७ वर्षांखालील): ४ सुवर्ण पदकांसह वैयक्तिक चॅम्पियनशिप.

इतर निकाल असा :

मास्टर्स व ओपन गट:

विशाल कुबल (मास्टर्स): ३ रौप्य, १ कांस्य पदक.

बीना तेंडुलकर (मास्टर्स): १ रौप्य, १ कांस्य पदक.

अल्फाराज कापडे (ओपन): ३ रौप्य पदक.

संस्कृती जाधव (ओपन): ३ रौप्य, १ कास्य पदक.

वयोगट खेळाडू :

योगेंद्र तावडे (१७ वर्षांखालील): २ सुवर्ण, १ कांस्य पदक.

आरोही पिलणकर (१७ वर्षांखालील): १ सुवर्ण, २ रौप्य, १ कांस्य पदक.

आयुष कताळे (१५ वर्षांखालील): ३ रौप्य, १ कांस्य पदक.

अर्णव पिलणकर (१३ वर्षांखालील): १ कांस्य पदक.

रिद्धेश हरचेकर (९ वर्षांखालील): १ कांस्य पदक.

आराध्या शिंदे (७ वर्षांखालील): २ रौप्य पदक.

रिले प्रकारातही सुवर्ण व रौप्यची लयलूट!

ओपन गटाच्या अटीतटीच्या रिले (Relay) स्पर्धेतही मिलके ग्रुपच्या दोन्ही संघांनी वर्चस्व राखले.

सुवर्ण पदक (ग्रुप A): संस्कृती जाधव, तनया मिलके, योगेंद्र तावडे, आयुष काळे.

रौप्य पदक (ग्रुप B): श्रावणी सावंत, नाझीफा मंगा, हर्शल सावंत, आयुष कताळे.

17 वर्षांखालील मुले रिले

सुवर्ण पदक हर्शल सावंत,आयुष कताळे,आयुष काळे, योगेंद्र तावडे यांना मिळाली.

या स्पर्धेत इझान कापडे व साईशा भोपळे या दोन्ही अवघ्या ४ वर्षांच्या चिमुकल्या खेळाडूंनी ७ वर्षांखालील गटात धाडसाने सहभाग घेतला. त्यांनी २५ मीटर व ५० मीटर अंतर यशस्वीरीत्या पूर्ण करत संपूर्ण क्रीडा संकुलाचे आणि प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

रत्नागिरी जिल्ह्याचे व ग्रुपचे मुख्य प्रशिक्षक, राष्ट्रीय जलतरणपटू आणि गुणवंत क्रीडा मार्गदर्शक २०२५ पुरस्कार विजेते महेश मिलके यांना या स्पर्धेत 'उत्कृष्ट मार्गदर्शक' (Best Coach) ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा आदर करत या संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांची 'मुख्य पंच' (Chief Referee) म्हणून निवड करण्यात आली होती, जी रत्नागिरीसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande