कल्याण आरटीओ कार्यालयात दुचाकींसाठी 'MH 05 GM' नवीन मालिका सुरू
ठाणे, 02 जून, (हिं.स.)। उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण येथे दुचाकी (Two-Wheeler) संवर्गासाठी ''MH 05 GM'' ही नवीन नोंदणी मालिका साधारणतः दिनांक ५ जून २०२६ रोजी सुरू करण्यात येणार आहे. या नवीन मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक (VIP Numb
कल्याण आरटीओ कार्यालयात दुचाकींसाठी 'MH 05 GM' नवीन मालिका सुरू


ठाणे, 02 जून, (हिं.स.)। उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण येथे दुचाकी (Two-Wheeler) संवर्गासाठी 'MH 05 GM' ही नवीन नोंदणी मालिका साधारणतः दिनांक ५ जून २०२६ रोजी सुरू करण्यात येणार आहे. या नवीन मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक (VIP Numbers) खरेदी करण्याची इच्छा असलेल्या वाहनधारकांसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुकांनी आपले अर्ज विहित मुदतीत सादर करावेत, असे आवाहन कल्याणचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बरकुल यांनी केले आहे.

नवीन दुचाकी वाहनांसाठी आकर्षक क्रमांक मिळवू इच्छिणाऱ्या वाहन मालकांचे अर्ज दिनांक १ जून २०२६, २ जून २०२६ व ३ जून २०२६ रोजी कार्यालयीन वेळेत स्वीकारले जातील.

विहित मुदतीनंतर म्हणजेच ३ जून २०२६ नंतर येणाऱ्या कोणत्याही अर्जांचा आकर्षक क्रमांक वाटपासाठी विचार केला जाणार नाही. त्यामुळे सर्व संबंधित इच्छुक वाहन मालक आणि वाहन वितरकांनी (Dealers) या कालमर्यादेची नोंद घेऊन वेळेत अर्ज सादर करावेत, असे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande