इस्रायल- अमेरिका स्वतंत्र राष्ट्रे, ट्रम्प यांच्याशी संबंधांवरील चर्चांना नेतान्याहूंचे उत्तर
जेरुसलेम, 22 जून (हिं.स.)।इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी जेरुसलेम येथे आयोजित जेएनएस शिखर परिषदेत बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी असलेल्या संबंधांबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांना फेटाळून लावले. त्यांनी स्पष्
इस्रायल- अमेरिका स्वतंत्र राष्ट्रे, ट्रम्प यांच्याशी संबंधांवरील चर्चांना नेतान्याहूंचे उत्तर


जेरुसलेम, 22 जून (हिं.स.)।इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी जेरुसलेम येथे आयोजित जेएनएस शिखर परिषदेत बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी असलेल्या संबंधांबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांना फेटाळून लावले. त्यांनी स्पष्ट केले की, इस्रायल आणि अमेरिका ही दोन्ही स्वतंत्र सार्वभौम राष्ट्रे असून ती आपल्या-आपल्या राष्ट्रीय हितांनुसार निर्णय घेतात.

इस्रायली पंतप्रधान म्हणाले की, “आमचे सर्वोच्च प्राधान्य इस्रायलची सुरक्षा आहे.” त्यांनी हेही मान्य केले की अनेकदा अमेरिका आणि इस्रायलची भूमिका समान असते, तर काही वेळा मतभेदही दिसून येतात. मात्र, दोन्ही देश एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा, नेतृत्वाचा आणि आपल्या नागरिकांप्रती असलेल्या बांधिलकीचा आदर करतात, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

जेरुसलेम येथे झालेल्या जेएनएस शिखर परिषदेत नेतान्याहू म्हणाले की, अमेरिकेच्या सहकार्याने इस्रायली सैन्याने इतिहासातील सर्वात मोठी हवाई मोहीम राबवून इराणच्या अणु कार्यक्रमाच्या पायाभूत सुविधांना मोठा फटका दिला आहे. त्यांनी सांगितले की, या कारवाईदरम्यान केवळ इराणलाच लक्ष्य करण्यात आले नाही, तर इराणच्या दहशतवादी तळांचाही नाश करण्यात आला.

स्वित्झर्लंडमध्ये सुरू असलेल्या अमेरिका-इराण शांतता चर्चेचा उल्लेख करताना नेतान्याहू म्हणाले की, या चर्चेचा निकाल काहीही लागला तरी इराणला अण्वस्त्रे मिळवू दिली जाणार नाही. तसेच, आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी जितका काळ आवश्यक वाटेल तितका काळ इस्रायली सैन्य दक्षिण लेबनानमधील सुरक्षा क्षेत्रात तैनात राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लेबनानचा संदर्भ देताना नेतान्याहू म्हणाले, “इस्रायलचा संघर्ष लेबनानशी नसून इराणच्या पाठिंब्याने कार्यरत असलेल्या हिजबुल्लाह या संघटनेशी आहे. हिजबुल्लाहने इस्रायलच्या सुरक्षेला धोका निर्माण करणे थांबवले, तर लेबनानसोबत शांततेचा मार्ग खुला होऊ शकतो, अशी मला आशा आहे.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande