छ. संभाजीनगरात भाजपाच्या १२ वर्ष सेवा, सुशासन व जनकल्याण विशेष जनसंपर्क अभियान
छत्रपती संभाजीनगर, 24 जून (हिं.स.)। भारतीय जनता पार्टीच्या १२ वर्ष सेवा, सुशासन व जनकल्याण या विशेष जनसंपर्क अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर शहरातील किराणा चावडी, दिवाण देवडी येथे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी ज्येष्ठ व
अ


छत्रपती संभाजीनगर, 24 जून (हिं.स.)।

भारतीय जनता पार्टीच्या १२ वर्ष सेवा, सुशासन व जनकल्याण या विशेष जनसंपर्क अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर शहरातील किराणा चावडी, दिवाण देवडी येथे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी ज्येष्ठ व्यापारी श्री. रविकुमार पहाडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन संवाद साधला.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने गेल्या १२ वर्षांत व्यापार, उद्योग आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. तसेच लघु व मध्यम व्यावसायिकांसाठी राबविण्यात आलेल्या विविध योजना, डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन, करप्रणालीतील सुधारणा आणि विकसित भारताच्या संकल्पनेविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

संवादादरम्यान व्यापारी वर्गाच्या अपेक्षा, स्थानिक विकासाशी निगडित विषय तसेच देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये व्यापारी समाजाच्या योगदानावर सकारात्मक विचारविनिमय झाला. राष्ट्राच्या विकासात व्यापारी वर्गाची भूमिका महत्त्वपूर्ण असून केंद्र सरकारच्या विकासाभिमुख धोरणांमुळे व्यवसाय क्षेत्राला नवी दिशा मिळाल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande