रत्नागिरी : जवाहर नवोदय विद्यालयात अकरावीसाठी २९ जूनपर्यंत प्रवेश
रत्नागिरी, 24 जून (हिं.स.) । पडवे (ता. राजापूर) येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात चालूक शैक्षणिक वर्षासाठी कला शाखेच्या अकरावीतील रिक्त जागा स्पॉट ॲडमिशन प्रक्रियेद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून २९ जूनपर्यंत अर्ज मा
रत्नागिरी : जवाहर नवोदय विद्यालयात अकरावीसाठी २९ जूनपर्यंत प्रवेश


रत्नागिरी, 24 जून (हिं.स.) । पडवे (ता. राजापूर) येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात चालूक शैक्षणिक वर्षासाठी कला शाखेच्या अकरावीतील रिक्त जागा स्पॉट ॲडमिशन प्रक्रियेद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून २९ जूनपर्यंत अर्ज मागविण्यात आल्याची माहिती विद्यालयाच्या प्राचार्यांनी दिली आहे.

प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सीबीएसई संलग्न शाळेतून किंवा रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्याही राज्य शिक्षण मंडळाच्या शाळेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनाच गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाणार आहे.रीतसर भरलेला प्रवेश अर्जासोबत दहावीचे गुणपत्रक, रत्नागिरी जिल्ह्याचा रहिवासी दाखला किंवा निवासाचा पुरावा सादर करावा.प्रवेश अर्ज जवाहर नवोदय विद्यालयात उपलब्ध आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी पूर्ण भरलेला अर्ज आवश्यक कागदपत्रांसह विद्यालयाच्या कार्यालयात समक्ष जमा करावा. तसेच अर्ज jnvratnagiri @gmail.com या अधिकृत ई-मेलवरही पाठविता येईल.अर्ज सादर करण्याची २९ जून २०२६ ही अंतिम मुदत असून, त्यानंतर येणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande