
रत्नागिरी, 24 जून (हिं.स.) । रत्नागिरी विभागीय कार्यालय, विभागीय कार्यशाळा, रत्नागिरी आगार व टीआरपी येथून सेवानिवृत्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा येत्या रविवारी (दि. २८ जून) रोजी सकाळी १० वाजता दत्त मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यामध्ये जून महिन्यात ज्यांचे वाढदिवस आहेत अशा सुमारे ४४ सभासदांचे वाढदिवस सन्मानाने साजरे करण्यात येणार आहेत. तसेच निवृत्त झालेल्या ज्या कर्मचाऱ्यांनी इतर क्षेत्रांमध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी केली आहे अशा सभासदांचेही सत्कार करण्यात येणार आहेत.
रत्नागिरी युनिटमधील रा. प. सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या सभासदांनी मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी