सेलूत विना परवाना तलवार बाळगणार्यास अटक
परभणी, 24 जून (हिं.स.)। शहरातील रहेमान नगर परिसरात विना परवाना तलवार बाळगणार्या एका व्यक्तीस सेलू पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून धारदार तलवार जप्त करण्यात आली आहे. पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, रहेमान नगर येथील जावेद हनीफ कुरेशी याने
सेलूत विना परवाना तलवार बाळगणार्यास अटक


परभणी, 24 जून (हिं.स.)।

शहरातील रहेमान नगर परिसरात विना परवाना तलवार बाळगणार्या एका व्यक्तीस सेलू पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून धारदार तलवार जप्त करण्यात आली आहे. पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, रहेमान नगर येथील जावेद हनीफ कुरेशी याने आपल्या घरात विना परवाना तलवार ठेवली आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ संबंधित ठिकाणी धाव घेतली. घरासमोर जाऊन जावेद कुरेशी यास चौकशीसाठी बोलावण्यात आले. यावेळी त्याने घरामागील मोकळ्या जागेतील टिनपत्राच्या खोलीत तलवार ठेवली असल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी झडती घेतली असता कपड्यात गुंडाळून ठेवलेली तलवार आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या तलवारीची एकूण लांबी 36 इंच, पात्याची रुंदी दीड इंच असून ती एका बाजूने धारदार व पुढील बाजूस टोकदार असल्याचे आढळले. सुमारे 1 हजार 50 रुपये किमतीचा हा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी जावेद हनीफ कुरेशी याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अरुण नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर बिट क्रमांक 1 चे पोलीस अंमलदार शेख उस्मान शेख हबीब यांनी ही कारवाई केली. पुढील तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande