स्वच्छता सैनिकांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढाकार
रायगड, 24 जून (हिं.स.)। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खालापूर नगरपंचायतीतील सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची काळजी घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खालापूर शहरच्या वतीने रेनकोटचे वाटप करण्यात आले. श्री रोशन खराळ आणि श्री वैभव भोईर यांच
NCP takes the initiative to assist sanitation workers.


रायगड, 24 जून (हिं.स.)। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खालापूर नगरपंचायतीतील सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची काळजी घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खालापूर शहरच्या वतीने रेनकोटचे वाटप करण्यात आले. श्री रोशन खराळ आणि श्री वैभव भोईर यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले.

नगरपंचायतीतील सफाई कर्मचारी पाऊस, वारा आणि प्रतिकूल हवामानातही नागरिकांना स्वच्छता सेवा देत असतात. त्यांच्या कामाचा गौरव आणि त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वितरण करून त्यांच्या सेवाभावी कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

या कार्यक्रमास रायगड जिल्हा परिषद सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खालापूर तालुका अध्यक्ष संतोषभाई बैलमारे, खालापूर शहराध्यक्ष संतोष गुरव, खालापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रोशनाताई मोडवे, उपनगराध्यक्ष किशोर पवार, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक संतोषभाई जंगम, गणेश पाटील, राजा गावडे, विकी लाखन, आकाश खराळ यांच्यासह नगरपंचायतीचे कर्मचारी आणि सर्व नगरसेवक उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या योगदानामुळे शहर स्वच्छ आणि सुंदर राहण्यास मदत होत असल्याचे सांगितले. सामाजिक बांधिलकी जपत अशा उपक्रमांमुळे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande