राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचे २९ जून रोजी परभणीत आगमन
परभणी, 24 जून, (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाने गोमातेला ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित केल्यानंतर गोसंवर्धन, देशी गाईंचे महत्त्व आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा २०२६’ आयोजित करण्यात आली
राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचे २९ जून रोजी परभणीत आगमन


परभणी, 24 जून, (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाने गोमातेला ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित केल्यानंतर गोसंवर्धन, देशी गाईंचे महत्त्व आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा २०२६’ आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा दि. २९ जून २०२६ रोजी परभणी जिल्ह्यात दाखल होणार असून विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या निमित्ताने परभणी शहरातील शिवाजीनगर भागातील स्वामी समर्थ मंदिर येथे संवाद, गो-उत्पादन प्रदर्शन तसेच मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमातून गोसंवर्धनाचे महत्त्व, देशी गाईंचे संवर्धन आणि त्यातून मिळणाऱ्या आर्थिक संधींबाबत माहिती दिली जाणार आहे.सदर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा पशुसंवर्धन विभाग, परभणी तसेच जिल्ह्यातील विविध गोशाळा संचालक आणि गोप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. या कार्यक्रमास विविध मान्यवर उपस्थित राहणार असून जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande